क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

बलात्काराच्या गुन्ह्यात लाच घेणे महिला पोलिसाला भोवले ;चोवीस तासाच्या आत निलंबित

पिंपरी(वास्तव संघर्ष) : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या सांगवी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षक यांनी बलात्काराचा गुन्हा न दाखल करण्यासाठी लाच घेताना गुरुवारी (ता.2 डिसेंबर) पकडण्यात आले. तर, त्यांच्यावतीने ही लाच घेणारा याच पोलिस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षक याला पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी चोवीस तासाच्या आत निलंबित केले आहे.

याबाबत दिपक शेंडगे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महिला पोलिस उपनिरीक्षक हेमा सिद्धराम सोळुंके (वय-28, रा. कृष्णानगर गल्ली नं-1 सांगवी ) सहाय्यक उपनिरीक्षक अशोक बाळकृष्ण देसाई (वय-52,रा.कृष्णा गॅलक्सी तुळजाभवानी नगर न-हे पुणे) यांना सत्तर हजार रुपयांची लाच घेताना निलंबित करण्यात आले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पोलिस उपनिरीक्षक हेमा साळुंके आणि सहाय्यक उपनिरीक्षक अशोक देसाई यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती तडजोडीअंती  सत्तर हजार रुपये हेमा साळुंके व अशोक देसाई या दोघांनी घेतले होते. एका 42 वर्षीय पुरुष तक्रारदाराविरुद्ध सांगवी पोलिस ठाण्यात दोन तक्रार अर्ज करण्यात आले होते. त्याची चौकशी महिला फौजदार साळुंके यांच्याकडे देण्यात आली होती. त्यात तक्रारदाराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी त्याच्याकडे एक लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र, लाच द्यायची नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (NCB) पुणे युनिटकडे तक्रार केली. तिची पडताळणी केल्यानंतर लावलेल्या सापळ्यात देसाईने लाच घेतली.  मात्र देसाई ACB च्या पथकाला धक्का मारून लाच रक्कमेसह दुचाकीवरून पळून गेला होता. या दोघांनाही 24 तासाच्या आत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी निलंबित केले आहे.

Share this: