“आयुक्त साहेब एकवेळ पाठीवर मारा, पण पोटावर नको.. टपरी चालकांची मागणी
पिंपरी(वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2022 सहभाग घेऊन भारतात पिंपरी चिंचवड शहर नंबर वन आणण्यासाठी शहरातील फुटपाथवरील टपरी पथारी आणि रस्त्यावर विकत असलेल्या भाजीपाला विक्रेत्यावर हिटलरशाही पद्धतीने अतिक्रमण कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांसह पोलीस आणि मोठ्या प्रमाणात ग्रीन मार्शल असतात. पालिकेच्या आठही प्रभागाच्या ठिकाणी हा मोठा फौजफाटा दिसत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून नागरिक झुंज देत असलेल्या कोरोनासारख्या महाभयंकर रोगापेक्षा ही कारवाई आहे. अशीच चर्चा शहरभर रंगू लागली आहे. एकिकडे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आपल्या एकुलत्या एक मुलांचे दुख: पचवत एका मायमाउलीने पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या मुलांची टपरी चालवण्यासाठी घेतली तीच्या टपरीवर देखील पालिकेने हातोडा मारत कारवाई केली तर दुसरीकडे अपंग असलेल्या व टपरीचे लायसन्स असलेल्या एका टपरीवर कार्यवाही केल्याने त्याच्या परिवारावर उपासमारीची वेळ आणली आहे.
माझ्या टपरीवर अतिक्रमण कारवाई नका करु साहेब अशी रडत विनवणी करणा-या मायमाउलीला अधिका-यांनी उत्तर दिले, आई आम्हाला तुमच्या पोटावर मारुन चांगले वाटते का? आम्हाला आयुक्तांकडूनच आदेश मिळाला आहे. तुमचे पाप घेऊन आम्ही कसे सुखी राहू आम्ही आमचे काम करत आहोत हे बोलल्यानंतर ती मायमाउली म्हणाली ‘बाळा तुमच्या आयुक्त साहबाला सांग ना एकवेळ पाठीवर मार पण पोटावर नको.. हे एकून उपस्थित नागरिक स्तंभ झाले.