क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये सोन्याचे मंगळसूत्र चोरणारा आरोपी पोलिसांनी केला गजाआड

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत सोन्याचे मंगळसूत्र चोरणारा आरोपी पोलिसांनी केला गजाआड केला आहे. या चोरटय़ाकडून 7 लाख 80 हजार रुपये सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत . पिंपरी चिंचवड पोलीस , गुन्हे शाखा युनिट 3 च्या वतीने ही कारवाई करण्यात आली.

सचिन उर्फ लंगड्या गोरक्षनाथ काळे ( वय 50 ) असे अटक चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , चाकण , आळंदी , दिघी परिसरात घरफोड्या करणारा सचिन काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. व तो मागील एक महिन्यांपासून घरफोडीच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात असल्याची माहिती युनिट 3 च्या पोलिसांना मिळाली. पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने आरोपी काळेला ताब्यात घेतले. सखोल तपासाअंती दहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले.पोलिसांनी आरोपीकडून 7 लाख 80 हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.

Share this: