आनंदाची बातमी…! आता महाराष्ट्र होणार मास्कमुक्त
पिंपरी (वास्तव संघर्ष) : दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसत आहे . एक नवीन सुरवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून म्हणजेच 2 एप्रिलपासून पूर्णपणे उठवण्यात येत आहेत.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली ते म्हणाले की, कोरोना काळात जे निर्बंध लावण्यात आले होते ते हटवण्यात आले आहेत. 726 दिवसांनंतर महाराष्ट्र निर्बंधमुक्त करण्यात आला आहे. इथे महाराष्ट्र मास्क मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी मास्क वापरणे ऐच्छिक आहे, असे त्यांनी सांगितले
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण उत्साहात साजरी करु शकू. हा जो काही सातत्याने प्रश्न विचारला जायचा, त्या प्रश्नाला या निर्णयातून घोषणा केली आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मास्क लावणे जरी ऐच्छिक असले तरी सर्वांनी खबरदारी म्हणून मास्क लावा. गर्दीच्या ठिकाणी अजूनही आपण आपल्या आरोग्यासाठी काही नियम पाळले पाहिजेत असेही टोपे म्हणाले आहेत. गेल्या दोन वर्षापासून आपण निर्बंधात आहोत, मात्र आता अखेर उद्यापासून पूर्ण मोकळीक मिळणार आहे.