बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनकडून नवनियुक्त न्यायाधिश पी. सी. फटाले यांचा सत्कार

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी – चिंचवड न्यायालयात पी . सी . फटाले यांची न्यायाधीश म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे . पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष अॅड . गोरखनाथ झोळ , सदस्य अॅड . प्राची शितोळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला .

या वेळी पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश ए . यू . सुपेकर , डी . आर . पठाण , आर . आर . काळे , एन . टी . भोसले , माजी अध्यक्ष अॅड संजय दातीर पाटील ॲड . विलास कुटे , अॅड . सुनील कडुसकर , अँड . दिनकर बारणे , महाराष्ट्र आणि गोवा शिस्तपालन समिती सदस्य अॅड . अतिश लांडगे , अॅड . प्रताप कडूस, अॅड. गोरक्ष लोखंडे व इतर वकील उपस्थित होते .

कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन उपध्याक्ष अॅड . पांडुरंग शिनगारे , सचिव अॅड . महेश टेमगिरे , सह सचिव अॅड . अनिल शिंदे , खजिनदार अॅड . हरिष भोसुरे , ऑडिटर अॅड . धंनजय कोकणे , सदस्य अॅड . ऋतुराज आल्हाट , अॅड . मंगेश नढे , अॅड . कृष्णा वाघमारे यांनी केले . अॅड . महेश टेमगिरे यांनी आभार मानले

Share this: