बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

रेशनकार्ड धारकांना आधारकार्ड लिंक करण्यासाठी 15 दिवसांची मुदत

पिंपरी (वास्तव संघर्ष )- रेशनिंगकार्डवर धान्य घेणाऱ्या नागरिकांना
आधारकार्ड संलग्न करण्यासाठी येत्या 31 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.या कालावधीत कुटुंबातील सर्व व्यक्‍तींचे आधारकार्ड वएका सदस्याचा वैध मोबाईल क्रमांक संलग्न न केल्यास फेब्रुवारी महिन्यापासून धान्य मिळणार नसल्याचे निगडी परिमंडल कार्यालयाने स्पष्ट केले आहे.पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत अ विभागाअंतर्गत एकूण 120 रेशनिंग दुकानदार असून, 40 हजार रेशनिंगकार्डधारक जोडले आहेत.

ज विभागात 82 दुकानांमधून 38हजार रेशनिंगकार्डधारकांना धान्य दिले जाते, तर फ विभागात सर्वाधिक 125 रेशनिंगदुकाने असून 45 हजार रेशनिंग कार्डधारकांना धान्य दिले जाते. या सर्व रेशनिंगकार्डधारक लाभार्थ्यांचे अधारकार्ड रेशनिंगकार्डला संलग्न असने बंधनकारक करण्यात आले आहे.याशिवाय या कुटुंबातील एका सदस्याचा वैधमोबाईल क्रमांकदेखलि संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांनी याबाबत सार्वजनिक वितरण व्यवस्थेला सूचना दिल्या आहेत. त्यानंतर या तीनही विभागातील रेशनिंग दुकानांमध्ये आधारकार्ड व मोबाईल संलग्न करण्याची व्यवस्था करुन देण्यात आली आहे. त्यानुसार धान्य घेणाऱ्या सर्व रेशनिंग कार्डधारकांना तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा व अंत्योदय योजनेतील लाभार्थींनीदेखील आधारकार्ड संलग्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील सर्व रेशनिंगकार्डधारकांनी 31 जानेवारीच्या आत कुटुंबातील सर्व सदस्यांचे अधारकार्ड व एका सदस्याचा वैध मोबाईल क्रमांक रेशनिंगकाडरशी संलग्न करावा. अन्यथा फेब्रुवारी महिन्यापासून रेशनिंगवरील धान्य मिळणार नाही.याला परिमंडल कार्यालय जबाबदार राहणार नाही.
दिनेश तावरे, परिमंडल अधिकारी, अ व ज विभाग, निगडी

Share this: