आरोग्यबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

कोव्हिड 19 लसीकरण मोहिमेस पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून सुरवात

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवडमध्ये कोव्हिड 19 लसीकरण मोहिमेस (शनिवारी) आजपासून सुरवात झाली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची आजपासून देशभर सुरवात होत आहे. त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड शहरातील 8 केंद्रावर लस देण्यात आली. महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पवन साळवे यांना जिजामाता रुग्णालयामध्ये लस टोचून लसीकरणाची सुरूवात करण्यात आली.

आरोग्य सेवा पुणे मंडळ यांच्याकडून कोविड 19 लसीकरणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला 15 हजार डोस मिळाले आहेत. जिजामाता रुग्णालयात झालेल्या या कार्यक्रमास खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे,उपमहापौर केशव घोळवे ,सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर ,शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेवक संदीप वाघेरे, शैलेश मोरे, प्रेमकुमार उर्फ बाबू नायर, नगरसेविका उषा वाघेरे,निर्मला कुटे, सविता खुळे,निकिता कदम ,अर्चना बारणे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी पवन साळवे, वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे ,वर्षा डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोना लसीकरणासाठी यमुनानगर रूणालय , नवीन जिजामाता रग्णालय , नवीन भोसरी रुग्णालय , वाय.सी.एम रुग्णालय , पिंपळे निलख दवाखाना , कासारवाडी दवाखाना , तालेरा रुग्णालय व ईएमआयएम रुग्णालय या ०८ लसीकरण केंद्रावर सुरूवात झाली आहे.

Share this: