आरोग्यबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

दूषित पाण्यामुळे गांधीनगर खराळवाडीतील नागरिकांना त्रास

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 येथे खराळवाडी, गांधीनगर भागातील पाणी प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्यासाठी बांधण्यात आलेल्या  पाण्याच्या टाकीचे उद्घाटन पालिकेच्या वतीने करण्यात आले. याठिकाणी 20 लाख लिटर क्षमतेची पाण्याची उंच टाकी व 10 लाख लिटर क्षमतेच्या पंप च्या कामाची उभारणी करण्यात आली. माञ असे असून देखील आज बुधवार (दि.16)रोजी गांधीनगर खराळवाडीतील नागरिकांना दूषित पाण्यामुळे  त्रास सहन करावा लागला .

गेली काही वर्षे दूषित पाणी पिऊन विविध आजारांना सामोरे जाणाऱ्या गांधीनगर खराळवाडीतील नागरिकांना पाण्याची टाकी बसवल्याने स्वच्छ पाणी मिळेल असे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात स्वच्छ पाणी मिळाले तर नाही पण दिवसाआड मिळत असणारे पाणी देखील वेळेवर व अस्वच्छ मिळत आहे.पाणी वेळेवर कधी मिळणार, पिण्याचे स्वच्छ पाणी कधी मिळणार? याकडे नागरिकांचे डोळे लागून राहिलेले आहेत. पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी अनेक वेळा आंदोलने  करावी लागलेली आहेत.

पाण्याच्या टाकीचा प्रश्न सुटला उद्घाटन केले पण गांधीनगर खराळवाडीतील नागरिकांना स्वच्छ आणि नियमित पाणी कधी मिळणार याबाबत वंचित बहुजन आघाडीचे सचिव राजेंद्र साळवे यांनी पाणीपुरवठा अधिका-याना प्रश्न केला असता त्यांनी याबाबत नियोजन झाले नसून पाणी पुरवठा होणा-या पाईपलाईन चेकिंग चालू करण्याचे काम सुरू आहे असे सांगितले मात्र जर पाईपलाईनचे काम झालेच नाही तर उद्घाटन का करण्यात आले असे देखील साळवे यांनी म्हटले.

Share this: