बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

आता तर थेट पालिकेला बनवला ”पाटलांचाच वाडा”

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून आयुक्त राजेश पाटील यांनी सोमवारी (दि.14) रोजी कार्यभार स्विकारला. पालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुका अद्याप घोषित झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर महापालिकेचा कारभार पाहण्यासाठी प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने घेतला त्यामुळे सर्व निर्णय घेण्याचा निर्णय आयुक्त राजेश पाटील यांना मिळाला आहे. मात्र प्रशासक म्हणून नियुक्त झालेल्या तीस-याच दिवशी आयुक्त राजेश पाटील यांना थेट पालिकेचा पाटीलवाडा केला असा फलकच हातात घेऊन रयत विद्यार्थी परिषदेच्या संघटनेने पालिकेच्या आवारात आंदोलन करण्यात आले.

यावेळी रयतचे अध्यक्ष सुर्यकांत सरवदे , रविराज काळे , ओमकार भोईर , ऋषिकेश कानवटे , प्रकाश घोडके , निरज सुतार , अभिजित कदम , अजय थेरूडकर , संदिप अग्गेल्लू आदी पदाधि उपस्थित होते .

यावेळी रयत विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी म्हणाले,पालिकेचे प्रशासक आणि आयुक्त राजेश पाटील यांनी आमच्या शिष्टमंडळास 4तास ताटकळत ठेऊन भेट नाकारली त्यामुळे आम्ही महानगरपालिकेसमोर बोगस वृक्ष गणनेच्या अहवालाची होळी करत आंदोलन केले. GIS पद्धतीने वृक्षगणना आणि देखभाल करण्यासाठी एकूण पाच वर्षासाठी मे टेरेकॉन इकोटेक प्रा . लि . या ठेकेदारास काम दिले होते . त्यानुसार दोन वर्ष वृक्षगणना करून तीन वर्ष देखभालीच्या कामाचे स्वरूप होते 11 जानेवारी 2018 ते आजपर्यंत वृक्ष गणना पूर्ण झाली नाही . टेरेकॉन इकोटेक कंपनीला वारंवार दंड आकारून आणि मुदतवाढ देऊनही वृक्ष गणनेचे आणि देखभालीचे काम झाले नाही आणि प्रभागातीलदेखभालीचे काम झाले नाही.

प्रभागातील वृक्षगणना झालीच नाही असे महानगरपालिकेच्या जाहीर केलेल्या वृक्ष गणनेच्या अहवालातून वेबसाईटवर स्पष्ट होते. प्रसिद्ध केलेला अहवाल पुर्णपणे बोगस आहे . महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या वृक्षगणना अहवालावर महासभेमध्ये किंवा वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये कसल्याही प्रकारची चर्चा न करता भेट मनमानी पद्धतीने अहवाल पोर्टलवर प्रसिद्ध केला आहे . त्यामध्ये हेरिटेज वृक्षांची पोर्टलवर संख्या दीड लाख दाखवली आहे . या हेरिटेज वृक्षांची दखल घेऊन गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करावी.जर हा अहवाल सत्य आहे असे वाटत असेल तर आपली महानगरपालिका जगातील आठवे आश्चर्य म्हणून नावलौकिकास येणार असल्याची भावना रयत विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली .

Share this: