दापोडीत अल्पवयीन मुलीवर घरात घुसून लैंगिक अत्याचार, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील दापोडीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलींवर घरात घुसून अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तर पालकांच्या तक्रारीची दाखल घेत पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्ह्याची नोंद करून कारवाई केली आहे.
हि घटना १ ९ / ०७ / २०२० रोजी ८ वाजताच्या सुमारास पीडीत अल्पवयीन राहते घरी अरुण टॉकीजजवळ लिबारे वस्ती , दापोडी , येथे घडली आहे.
याप्रकरणी आरोपी जितेंद्र कलीराम चंडालीया (वय ३५ वर्ष , रा . अरुण टॉकीजजवळ लिंबारे वस्ती , दापोडी , पुणे) याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हया वॉशरुम मध्ये गेल्या होत्या व त्यांची अल्पवयीन पिडीत मुलगी ही तिचे तोंडात फोड आल्यामुळे बेडवर झोपली होती. त्यावेळी घरात कोणी नसल्याचा फायदा घेवुन यातील नमुद आरोपी हा पुर्ण नग्न होवुन फिर्यादी यांच्या मुलीच्या अंगावर झोपला व मुलीशी अश्लील चाळे केले व तिच्या मनास लज्जा उत्पन्न केली म्हणुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास भोसरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसोडे करीत आहेत.