बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीसोबत जाऊ नये, ही अभद्र युती महाराष्ट्रात होऊ नये – मिलिंद एकबोटे

पुणे (प्रतिनिधी) राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या आघाडीसाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे शिवसेना आणि भाजपने शेतकर्‍यांचा विचार करता, एकत्र न येणे हा जनमताचा अपमान होईल असे वक्तव्य समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे पुण्यात आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते .

एकबोटे पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या निकालातून भाजपा-शिवसेनेला सत्तास्थापनेचा जनादेश मिळाला असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, मुख्यमंत्रीपद आणि सत्तेतील समसमान वाटा या मुद्यांवरून दोन्ही पक्षांची युती तुटली. शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडत, सत्तास्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीशी हात मिळवणी करत महाशिवआघाडीचे सरकार राज्यात आण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

यावेळी त्यांनी भाजपाने जुने दिवस विसरू नये असा सल्ला देखील दिला. तसेच, शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे. राजकारणात कृतज्ञता ठेवावी. एकेकाळी १५ ते २० आमदार असलेला भाजप पक्ष हा मोठा झाला आहे. यामध्ये शिवसेनेचे योगदान आहे हे त्यांनी हे विसरू नये. लोकांना भाजप-शिवसेनेचे सरकार हवे आहे. यासाठी दोघांनीही एक पाऊल मागे येऊन एकत्र येणे आवश्यक आहे. हिंदुत्वाची युती तोडून काँग्रेस आघाडीसोबत जाणे, योग्य नाही. ही अभद्र युती होऊ नये, असे त्यांनी यावेळी सांगितले. हिंदुत्ववादी मतांची फाटाफूट होऊ नये, अन्यथा जनता माफ करणार नाही. असा इशारा देखील भाजपा व शिवसेनेला यावेळी त्यांनी दिला.

Share this: