क्राईम बातम्याबातम्या

धक्कादायक :आई-वडिलांच्या सांगण्यावरून पतीने केला पत्नीचा खून

पिंपरी (वास्तव संघर्ष ) :- आई-वडिलांच्या सांगण्यावरून पत्नीचा खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मंगळवारी महिलेच्या घरी तिचा मृतदेह संशयस्पदरित्या आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला होता.

मृत्यू झालेल्या महिलेच्या आईने भोसरी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सारिकाचा मृतदेह तिच्या घरी आढळून आला होता. दोन वर्षापूर्वी सारिका आणि योगेशचा विवाह झाला होता. सारिका आणि पती योगेशसह सासू, सासरे हे केगाव येथे राहात होते. मात्र, सारिकाला वेगळं राहायचं होतं. तिने तसा हट्ट योगेशकडे धरला होता. त्यानंतर ते पिंपरी-चिंचवडमध्ये आले.


माञ योगेश या बाबतीत खुश नव्हता. त्याला आई वडिलांना सोडून राहायचे नव्हते. त्यामुळे सारिका आणि योगेशमध्ये किरकोळ कारणावरून अनेकदा वाद होत होते, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. आई वडिलांच्या सांगण्यावरून योगेशने सारिकाचा खून केला असावा, असा संशय सारिकाच्या आई वडिलांना असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटलं आहे. दरम्यान, तिचा पती योगेश याला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे

Share this: