मेलो तरी बेहत्तर हेल्मेट घालणार नाही, हेल्मेट सक्ती कायदा बनवणारा गाढव-पुणेकर
पुणे(वास्तव संघर्ष) केंद्रीय मोटार वाहन कायद्यातील तरतुद तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार पुण्यात वाहतुक पोलिंसाकडून हेल्मेट न घालणार्या दुचाकी चालकावर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याला हेम्लेट सक्ती विरोधी समितीने विरोध दर्शविला आहे या समितीचे म्हणणे आहे की आमचा हेम्लेटला विरोध नसून हेल्मेट सक्ती ला विरोध आहे. हेम्लेट घालणे ऐच्छिक असावे असे समितीचे म्हणणे आहे.
या समितीतील अनेक सदस्य रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. एका सदस्याचे म्हणणे असे आहे की, हेम्लेट घालून मरण येत नाही असे कुठं लिहले आहे का? मी शेवटपर्यंत हेम्लेट सक्तीला विरोधच करेल मी मेलो तरी बेहत्तर पण हेम्लेट घालणार नाही असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, पुण्यातील पोलीस आयुक्त के. व्यंकटेश यांच्याशी यावर चर्चा देखील करण्यात आली आहे असे हेम्लेट सक्ती विरोधी समितीने सांगितले.
हेल्मेट सक्ती विरोधात पुणेकरांनी सोशल मीडियाचा देखील वापर केलेला दिसून येतो एका वयोवृद्ध पुणेकर नागरिकांने हेल्मेट सक्तीला विरोध करत मी तरूणपणापासून हेल्मेटला विरोध करत आहे. कायदा कशासाठी तर कुणाच्यातरी फायद्यासाठी असे म्हणत त्यांनी हा कायदा ज्यांने बनवला तो गाढव आणि नालायक आहे तो गाढव माणसांना कायदा शिकवतो असेही ते या व्हिडिओत म्हणत आहेत.