बातम्यामहाराष्ट्र

तुला झेपत नसेल, तर तू शिकू नको. नोकरी कर’-विनोद तावडे

 

अमरावती : ‘आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही; सरकार त्यांना मोफत उच्च शिक्षणासाठीची सोय उपलब्ध करून देईल काय?’ हा प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला ‘तुला झेपत नसेल, तर तू शिकू नको. नोकरी कर’असे अफलातून उत्तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. शिवाय त्याचे चित्रीकरण करणा-या अन्य विद्यार्थ्याला अटक करा, असे आदेश त्यांनी दिले. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

शिवाजी शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती येथे ही घटना शुक्रवारी घडली. मंत्र्यांच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करत पोलिसांनी त्या विद्यार्थ्यास वाहनात डांबून ठेवले.

दरम्यान इतर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करताच त्याला सोडून देण्यात आले. माणिकराव घवळे वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे आले होते. मंत्र्यांचे भाषण संपल्यावर पत्रकारितेच्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारण्यासाठी मंत्र्यांचे लक्ष वेधले. त्याकडे दुर्लक्ष करत शिक्षणमंत्री जात असताना विद्यार्थ्यांनी एकच गलका केल्यानंतर तावडे यांनी प्रश्न विचारण्यास अनुमती दिली. तेव्हा प्रशांत शिवा राठोड या विद्यार्थ्याने वरील प्रश्न विचारला. मात्र तावडे यांना तो रूचला नाही.

Share this: