माझं पिंपरी -चिंचवड

नाशिक फाटा येथे मेट्रोचे काम सुरू असताना मोठी क्रेन मशीन कोसळली

वास्तव संघर्ष

पिंपरी-चिंचवड येथील दापोडी पिंपरी दरम्यान काम वेगाने सुरु आहे. मेट्रोच्या पिलरचे खड्डे ड्रीलमशिनच्या साह्याने खोदले जात आहे. याच दरम्यान नाशिक फाटा येथे मेट्रोचे काम सुरू असताना मोठी क्रेन मशीन कोसळली. आज (शनिवार) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. सध्या ही क्रेन हटविण्याचे काम सुरू आहे.

 

अचानक मशिन उलटी झाल्यानंतर पुणे – मुंबई महामार्गावर वाहतुक कोडी झाल्याचे पाहण्यात आली. नेमका हा प्रकार कसा घडला हे अजून अस्पष्ट आहे. पोलिसांनाही याबाबत तक्रार आली नसून मेट्रोचा हा भोंगळ कारभार पाहून संताप व्यक्त केला जातो.

 

 

 

 

Share this: