क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

‘गे’असल्याचे व्हायरल करण्याची तरूणाला धमकी

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवडमध्ये एमबीएचे शिक्षण करणाऱ्या एका तरुणाला पुण्यातील चौघांनी सेक्स ची ऑफर देत बोलावून घेतलं . त्यानंतर त्याला रात्रभर डांबून ठेवलं , त्याच्या जवळचे सर्व पैसे काढून घेतले , त्यानंतर त्याला ‘ गे ‘ असल्याचे सर्वत्र व्हायरल करेन अशी धमकी देण्यात आली. खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली.

पिडीत तरुणाने याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार साहिल कुरेशी, अनिकेत जाधव, सुदामा चौधरी, रोहित चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,फिर्यादी हा पिंपरी – चिंचवड शहरातील एका नामांकित महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेतोय. होस्टेलवर राहणाऱ्या या तरुणाने फेसबुकवर बनावट खाते उघडले होते. याच माध्यमातून त्यांची ओळख आरोपी साहिल कुरेशी याच्यासोबत झाली होती. त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक एक्सचेंज केले होते , ते फोनवर बोलत असत.दोन दिवसांपूर्वी आरोपी साहिल त्याने फोन केला आणि सेक्स ची ऑफर देत त्या तरुणाला पुण्यात बोलावले . फिर्यादी तरुण देखील पुण्यात येण्यासाठी तयार झाला . खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका घरात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तो आला.

त्याच वेळी साहिलचे काही मित्र देखील त्या ठिकाणी होते. त्यांनी पेट्रोल संपल्याने इथे आलो असल्याचा बहाणा केला , दरम्यान बोलत असताना हे साहिलचे घर नसल्याचे त्या तरुणाच्या लक्षात आले.“ काही वेळाने चौघांनी त्याला दमदाटी करण्यास सुरूवात केली . पैसे मागितले . परंतु , पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी माझा व्हिडीओ काढत असल्याचे भासवून तसेच मी गे असल्याचे दाखव अशी भिती घातली . तर काढलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याचा मोबाईल घेतला ” असे तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी त्याच्या मोबाईलवरून ऑनलाईन 55 हजार 679 रुपये ट्रान्सफर करून घेतले आणि रात्रभर त्याला खोलीतच डांबून ठेवले . दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला सोडून दिले . त्यानंतर या तरुणाने पोलीसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे . त्यानुसार पोलीसांनी या चौघांनी अटक केली. अधिक तपास खडक पोलीस करीत आहेत.

Share this: