अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी भाजप सरकार देणार दारू विक्रीचा परवाना
वास्तव संघर्ष
नागपूर : गावागावात अवैध दारुला लगाम घालण्यासाठी भाजप सरकारने अजिब शक्कल लढवली आहे. महामार्गावर बंद पडलेली दारुची दुकाने सुरू करण्यात येणार आहे. १५०० परपीट रुम्स सूरू होणार आहेत, ४०० देशी दारूची दुकाने सुरु होणार, ८०० बिअर शॉपी सुरू होणार आहेत, यासाठी भाजप सरकारने दारू विक्रीचा परवानाच देणार आहे.
तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावात दारू विक्रीला परवानगी देण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी अवैध दारूच्या धंद्यावर छापे टाकले होते. हे अवैध दारू धंदे बंद व्हावे यासाठी सरकार हा निर्णय घेत आहे,असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले .
पुर्वी पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावालाच दारुचे लायसन्स दिले जात होते .माञ यंदा तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावात देखील दारू विक्रीला परवानगी देण्यात येणार आहेत. उत्पादन शुल्क विभागाला यावर्षी पंधरा हजार कोटीचे कर वसूल करण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. त्याला पुर्ण करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे दारुमुळे उध्वस्त होणाऱ्या कुटुंबाकडे सरकारचे लक्ष का नाही? असेच नागरिक विचारत आहेत.