बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

म्हणून रामदास आठवले यांच्या नावाची मी टोपी घातली-अमर साबळे


पिंपरी (वास्तव संघर्ष ) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे नेते आहेत त्यामुळे ख-या अर्थाने आठवले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार घेऊन पुढे जात आहेत. त्यांचे नेतृत्व आंबेडकरी समाजासह मी ही स्विकारतो म्हणून त्यांच्या नावाची टोपी मी घातली आहे. असे विधान भाजप खासदार अमर साबळे यांनी रविवार ( दि. १३)रोजी चिंंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन च्या कार्यक्रमास संबोधीत करताना बोलत होते . यावेळी खासदार अमर साबळे, रिएफचे विनोद चांदमारे, रिपाइंचे अविनाश म्हातेकर, चंद्रकांता सोनकांबळे, अरिफ शेख, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, बाळासाहेब भागवत, अजिज शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी भाजपला आतुन पाठिंबा देण्याऐवजी त्यांनी उघड भाजपबरोबर यावे, मीही यापुर्वी काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात रिडालोसचा प्रयोग केला आहे. त्यावेळी माझ्याही सभांना गर्दी व्हायची, लोक सभा ऐकून मतदान करीत नव्हती, तो प्रयोग आमचा फसला होता. आताही वंचित आघाडीचा उलट काॅंग्रेस-राष्ट्रवादीला तोटा होणार आहे. तर एमआयएम देखील भाजपलाच मदत करीत आहे. त्यामुळे वंचित आघाडीचा आम्हाला विशेष काही फरक पडणार नाही असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

Share this: