बातम्यामहाराष्ट्र

भिडेंच्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडने घातला गोंधळ, पोलिसांनी केला लाठीमार

जालना : जालन्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेच्या वतीने आयोजित शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेड, पॅथर सेना आणि अनुसूचित जातींच्या संघटनांनी गोंधळ घातला. यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला आहे असे समजते . जालन्यातील आर्य समाज मंदिरात संभाजी भिडे यांची बैठक होती. कार्यक्रमस्थळी विरोध करणारे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला.

गेल्या आठ दिवसांपासून शहरातील संभाजी भिडे यांच्या नियोजित कार्यक्रमाविषयी माहिती सोशल मीडियावरून फिरत होती. त्यामुळे संभाजी ब्रिगेड आणि काही संघटनांचा या कार्यक्रमाला कडाडून विरोध होता. सकाळी कार्यक्रमस्थळी या संघटना आल्या आणि त्यांनी भिडेंविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला.

Share this: