बातम्यामहाराष्ट्र

तुम्ही मतदान केले का? असे विचारताच अभिनेता अक्षय कुमार भडकला

दिल्ली – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मुलाखत अभिनेता अक्षयकुमार ने घेतल्यानंतर अक्षयकुमारने लोकसभा निवडणुकीत मतदान न केल्याने नेटकऱ्यांनी त्याला चांगलच ट्रोल केलं होतं. आता याच प्रश्नांसंदर्भात त्याला पञकाराने विचारले असता अक्षयकुमारला राग आला आणि तो म्हणाला ‘चलीए, चलीए असा उडवाउडवीचा व्हिडीओ वायरल झाला आहे.

झालं असं की देशभक्तीचे चिञपट करणारा अक्षय कुमार जेव्हा पञकारासमोर आला त्यावेळी पञकारांनी त्याला विचारले की तुम्ही चिञपटाचे हिरो असल्याने चाहत्यांचे प्रेम तुम्हाला जास्त भेटते, पण तुम्ही मतदान का केले नाही इतक्या छोट्याश्या गोष्टीबाबत तुम्हाला लक्ष्य केले जाते असा प्रश्न विचारत असताना अक्षयकुमार ने पञकारांचा प्रश्नही पुर्ण होऊ न देता म्हणाला ‘चलीए चलीए’ इतकंच नव्हे परत पाठीमागे फिरत तो म्हणाला हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो.

दरम्यान सोमवारी मतदानाच्या दिवशी अक्षयकुमार यांच्या पत्नी ट्विंकल खन्ना यांनी मतदान केलेला सेल्फी आपल्या ट्वीटर हँडलवर पोस्ट केला आणि त्यावर व्होट इंडिया व्होट इंडिया असे लिहिले होते.

Share this: