बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये खाजगी वाहनातून प्रवास करताना मास्कची सक्ती नाही

पिंपरी (वास्तव संघर्ष) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवताना पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले होते . आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आणि कोरोनावरील लस आल्याने या नियमामध्ये सूट देण्यात आली आहे . पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात चारचाकी वाहनात कुटुंबियांसोबत प्रवास करताना मास्कची गरज नाही .मात्र गाडीतील प्रवासी हे कुटुंबातील असले पाहिजेत .

ही सवलत फक्त खासगी वाहनांना असणार असल्याचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सांगितले आहे .पिंपरी चिंचवड शहरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खाजगी चारचाकी वाहनांतून प्रवास करणा-या प्रवाशांनी सक्तीने मास्क घालण्याची अट वगळून कुटुंबासमवेत विना मास्क प्रवास करण्याची मुभा मिळावी अशी मागणी वजा विनंती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे.

सध्या मुंबई पाठोपाठ पुणे शहरात देखील कुटुंबासोबत खाजगी वाहनाने विनामास्क प्रवास करण्यास मुभा देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.तरी खाजगी चारचाकी वाहनातून कुटुंबासमवेत प्रत्यक्ष प्रवास करत असताना मास्क घालण्यावरील बंधन उठवून पुणे शहराप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरातील प्रवाशांना दिलासा देणेबाबत महापौरांकडून संबंधितांस योग्य त्या कार्यवाहीचे निर्देश व्हावेत, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

Share this: