मंदिर- मस्जिद-चर्च सुरू करण्यासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे देशव्यापी आंदोलन करण्याचा रामदास आठवले यांचा इशारा
मुंबई (वास्तव संघर्ष) – कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन मध्ये सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली आता मात्र अनलॉक सुरू झाले आहे. आज कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेत प्रबोधन झाले असल्यामुळे पुरेशी खबरदारी घेऊन सुरक्षेचे नियम पाळून येत्या दि. 8 सप्टेंबर पर्यंत मंदिर मस्जिद चर्च बुद्धविहार गुरुद्वारा देरासार अशी सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करावीत अन्यथा दि. 9 सप्टेंबर रोजी रिपब्लिकन पक्षातर्फे देशभर सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिला आहे.
सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू केल्याने कोरोना चा प्रादुर्भाव वाढेल असे नाही. आता अनलॉक चे नियम जाहीर झाले असून आतापर्यंत मॉल ला उघडण्यास ही परवानगी दिली आहे.100 लोकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रमांना केंद्र सरकार ने परवानगी दिल्याची मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी सुरक्षेचे नियम ;फिजिकल डिस्टन्स पाळून; पोलीस बंदोबस्त ठेवून सकाळी 8 ते दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजे पर्यंत सर्व धर्मीयप्रार्थनास्थळे येत्या दि. 8 सप्टेंबर पर्यंत सुरू करावीत अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी असून जर दि. 8 सप्टेंबर पर्यंत सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू केली नाहीत तर रिपब्लिकन पक्षातर्फे देशभर आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा ना रामदास आठवले यांनी आज दिला.