पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची संवेदनशीलता ; निधन झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या परिवाराला दिल्या दिवाळी भेटवस्तू
पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्विकारल्यापासुन आयुक्तालयातील अधिकारी अंमलदार यांच्या विषयी संवेदनशिलता जपत कुटुंब प्रमुखाचे कर्तव्य पार पाडत आहेत. पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवडमध्ये अद्याप पर्यंत कर्तव्यावर असताना जे पोलीस अंमलदार निधन झालेले आहेत त्यांच्या कुटुंबीयांना दिपावली पर्वानिमित्त भेट व शुभेच्छा पत्रे पाठवुन दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अंमलदार जरी निधन झाला तरी त्यांचे कुटुंबीय हे पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड यांचे परिवाराचे सदस्य आहेत. त्यांची आठवण दिपावली पर्वानिमित्त होण स्वाभाविक आहे.
आपल्या भावना व शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहचल्या पाहिजेत हि संकल्पना मांडल्यानंतर पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी त्यास पाठपुरावा करून सर्व भेट व शुभेच्छा पत्रे संबंधीत कुटुंबीयांच्या घरी पोहचवण्याची व्यवस्था केली या संपुर्ण प्रक्रीयेत पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश , अ.पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ , व.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे , नियंत्रण कक्ष पोलीस अंमलदार सागर सुर्यवंशी , विष्णु उंडे , प्रितम वाघ , कुंदन तोत्रे , यांनी सहभाग घेवुन पुर्तता केली आहे .