क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

सोनाराच्या दुकानात लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला सांगवी पोलिसांनी केली अटक

सांगवी (वास्तव संघर्ष) – पुण्यात राहणा – या पाहुण्यांकडे मुंबईतून येणारी महिला पिंपरी – चिंचवड परिसरातील सोनाराच्या दुकानात जाऊन चो-या करायची . ती महिला ग्राहक म्हणून दुकानात जाऊन दुकानदाराची नजर चुकवून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने अलगद चोरून न्यायची.सांगवी पोलिसांनी महिलेचा माग काढून तिला अटक केली .

विद्या गंगाधर थोरात ( वय 49 , रा . निळेमोरे गाव , नालासोपारा मुंबई . मूळ रा . राशीन , ता . कर्जत , जि . अहमदनगर ) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , सांगवी परिसरात सोनाराच्या दुकानात ग्राहक म्हणून जाऊन सोन्याची चमकी खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानदाराची नजर चुकवून दुकानातून सोन्याच्या चमक्या चोरून नेल्याच्या घटना घडल्या होत्या . याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते . या गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासात महिलेचा माग काढला . संशयित महिला एका कारमधून जात असल्याचे निष्पन्न झाले . त्यानुसार पोलिसांनी कार चालकाचा शोध लाऊन त्याला ताब्यात घेतले . कार चालकाने सांगितले कि , ती महिला मुंबई येथील आहे . ती आमच्याकडून गाडी भाड्याने घेऊन तिच्या पुण्यातील नातेवाईकांच्या घरी आली होती . ती पुन्हा येणार असल्याचेही कार चालकाने सांगितले .

त्यानुसार पोलिसांनी महिलेच्या येण्याच्या मार्गावर सापळा लावला . महिला एका रिक्षातून आली असता पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली . सुरुवातीला तिने पोलिसांना गुंडाळण्याचा प्रयत्न केला . मात्र , पोलिसांच्या चौकशी समोर ती टिकली नाही . तिने सांगवी आणि चिंचवड परिसरात अशा प्रकारे चोऱ्या केल्याचे कबूल केले . पोलिसांनी तिच्याकडून 120 ग्राम वजनाचे सहा लाखांचे सोने जप्त केले . या कारवाईमुळे सांगवी पोलीस ठाण्यातील तीन आणि चिंचवड पोलीस ठाण्यातील तीन असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत .

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , अपर आयुक्त रामनाथ पोकळे , उपायुक्त आनंद भोईटे , सहाय्यक आयुक्त गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) अजय भोसले , उपनिरीक्षक यशवंत साळुके , पोलीस कर्मचारी चंद्रकांत भिसे , कैलास केंगले , सुरेश भोजणे , रोहिदास बो – हाडे , अरुण नरळे , विजय मोरे , शशिकांत देवकांत , नितीन खोपकर , अनिल देवकर , शिमोन चांदेकर , नीलम गायकवाड , शंकर चिंचकर यांनी केली .

Share this: