बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

कौतुकास्पद; पिंपरी-चिंचवड शहरातील बेघर आणि भिक मागून जगणा-या वंचिताना दिवाळीनिमित ड्राय फ्रूट वाटप

पिंपरी (वास्तव संघर्ष) :दिपावली हा सण उत्सवाचा , चैतन्याचा सण असला तरी प्रत्येकाच्या वाट्याला आनंद येताेच असं नाही. पिंपरी चिंचवड शहरातील निराधारांना हा दिवाळी सण विस्मरणीय करण्याचे कौतुकास्पद काम शहरातील महाईसेवा केंद्राचे संचालक अविनाश वाघमारे पाटील यांनी केले आहे .

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सावली निवारा केंद्र येथे राहणाऱ्या बेघर, फुटपाथवर झोपत असलेले गरिब, आणि रस्त्यावर भिक मागून जगणा-या वंचिताना दिवाळीनिमित महा ई सेवा संचालक अविनाश वाघमारे पाटील ,राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी अध्यक्ष डॉ. राजेश नागोसे यांच्या वतीने मोफत ड्राय फ्रूट पाकिटे वाटून त्यांची दिवाळी गाेड केली आहे .

वास्तव संघर्षशी बोलताना वाघमारे पाटील म्हणाले,दरवर्षी दिवाळी निमित्त गरजू नागरिकांना दिवाळीच्या फराळाचे वाटप केले जाते. यंदा महानगरपालिकेच्या निवारा केंद्रात राहणाऱ्या फुटपाथवर राहणाऱ्या लाेकांना मोफत ड्राय फ्रूट पाकिटे वाटण्यात आले . खरंतर
ड्राय फ्रूट खाणे हा जसा श्रीमंतांचा अधिकार आहे, तसाच या गरिबांचा देखील त्यावर तितकाच हक्क आह .हेच यातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

Share this: