सुपरड्राय कंपनीच्या बनावट जीन्स दुकानात विक्री केल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी (वास्तव संघर्ष) : विनापरवाना सुपरड्राय कंपनीच्या लोगो वापरुन बनावट जीन्स दुकानात विक्री केल्याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. या विक्रेत्यांवर कॉपीराइट ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . लिजेंडस् चॉईस, साई चौक, पिंपरी येथे रविवारी (दि .03 ) ही कारवाई करण्यात आली .
महेंद्र सोहन सिंग यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
इस्माईल इस्तेखार खान (वय 26, रा. एस एन बी पी, मोरवाडी, पिंपरी ) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सुपरड्राय कंपनीच्या बनावट जीन्स दुकानात विक्रीसाठी ठेवल्या होत्या . फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून दुकान अटक केली आहे. दुकानात 25 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या 512 जीन्स आढळून आल्या. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत .