क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

शुल्लक कारणावरून मित्रांनीच केला मित्राचा खून

भोसरी (वास्तव संघर्ष) : शुल्लक कारणावरून मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना भोसरीमध्ये घडली आहे. एका मित्राच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी सोबत मिळून हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर आपापसात झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला. ही घटना रविवार (दि.03) दुपारी तीनच्या सुमारास धावडेवस्ती भोसरी येथे घडली .

आसिफ सय्यद ( वय-24, रा. चक्रपाणी वसाहत भोसरी पुणे ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे .

विशाल ऊर्फ जीवन कवळकार (वय-28 रा. पांडवनगर लेन चक्रपाणी वसाहत भोसरी पुणे ) कृष्णा मोरे उर्फ एम. के वय (वय – 30 रा. चक्रपाणी वसाहत भोसरी पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असिफ यांच्या मिञांच्या वाढदिवसानिमित्त सम्राट हॉटेल समोर पुणे नाशीक रस्ता धावडेवस्ती भोसरी पुणे या ठिकाणी जेवण करण्यासाठी आले.जेवणानंतर आसीफ यांच्याशी आरोपी विशाल सोबत किरकोळ कारणावरून शाब्दीक वाद झाला. त्यातून आरोपी विशाल याने चिडून जावून त्यास जीवे ठार मारण्याचे उद्देशाने आरोपी कृष्णा याचेशी संगणमत करून त्यास अर्धवट फुटलेल्या टोकदार बाटलीने त्याच्या मानेवर गंभीर दुखापत करून जीने ठार मारले.त्यानंतर मयत आसिम यांचा मित्र स्वराज हा आसीफ यांच्या मदतीला आला असताना त्यास देखील काचेच्या फुटक्या टोकदार बाटलीने पाठीवर मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला व तेथून पळुन गेले. अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Share this: