क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

‘आयपीएल’च्या क्रिकेट सामन्यांवर ‘बेटिंग’ घेणाऱ्या बुकीला अटक 

पिंपरी (वास्तव संघर्ष) : आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर बेटिंग सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्तांना मिळाली.   त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून काळेवाडी परिसरात घरात
बसून ‘बेटिंग’ घेणाऱ्या बुकीला  अटक केली आहे. त्याच्याकडून 27 लाख 25 हजार रुपये, आठ मोबाईल, बेटिंग खेळण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई शनिवार (दि.2) रोजी गुंडा विरोधी पथकाने केली आहे.

प्रकरणी हजरतअली पठाण यांनी फिर्याद दिली आहे.

सनी गिल, रिकी राजेश खेमनानी (36, पिंपरी), सुभाष रामकिसन आगरवाल (57, रा. पिंपरी) या तिघांना अटक केली आहे तर सनी सुखेजा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यातील सनी गिल हा गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या गुजरात टायटन आणि दिल्ली कॅपिटल या सामन्यांवर बेटिंग सुरु  असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना मिळाली. काळेवाडी येथील एका सोसायटीमध्ये घरात सुरू असलेल्या बेटिंग घेताना-खेळणा-यांना  गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने आणि त्यांच्या पथकाने छापा मारला.

त्याच्याकडूनच मोठ्या प्रमाणात पैसे आणि इतर साहित्य आढळून आले. दरम्यान पोलीस कारवाई करत असताना यातील आरोपी सनी  याने सरकारी कामात अडथळा निर्माण केला.‘मला हात लावायचा नाही, माझी ओळख वर प्रयत्न आहे, माझ्यावर कारवाई केल्यास चांगले होणार नाही’ अशी धमकी देत पोलिसांसोबत झटापटी करत कारवाई करताना अडथळा निर्माण केला. पोलिसांनी या प्रकरणी वेगळा गुन्हा दाखल केला आहे. आयपीएलच्या या सिझिनमध्ये शहरात पहिलीच मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे. कारवाईनंतर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर हे घटनास्थळी पोहचले होते.

Share this: