बातम्या

व्यायामशाळेतील प्रशिक्षक हटवण्याचा निर्णय पालिकेने मागे घ्यावा – विक्रम पवार

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या व्यायामशाळेतील प्रशिक्षक हटवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पालिकेच्या हद्दीत काही ठिकाणी जागा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी फिटनेस साहित्य म्हणजेच ‘ओपन ‌जिम’ तयार केली जात हे स्वागतार्ह असून व्यायामशाळेतील प्रशिक्षण हटविल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते विक्रम पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत पवार यांनी आयुक्त राजेश पाटील यांना लेखी निवेदन दिले आहे त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सन 2022 – 23 या वित्तीय वर्षाकरिता महापालिका हद्दीतील विविध व्यायामशाळेतील प्रशिक्षक हटविण्याचा प्रस्ताव पालिकेत मंजूर करण्यात आला आहे.

मात्र हा निर्णय चुकिचा असून नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रशिक्षक म्हणून योग्य काम करत असतो. प्रशिक्षक नेमल्यास नागरिकांना व्यायाम करण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले जाऊ शकेल. फिटनेस साहित्य कसे हातळावे योग्य ठिकाणी साहित्य कसे बसविणे व त्यांची निगा राखणे तसेच प्रत्येक फिटनेस साहित्य बसविलेल्या व्यवस्थित ठेवणे यावर प्रशिक्षक कटाक्षाने लक्ष ठेवत असतो. तरीदेखील आयुक्तांना आपल्या निर्णयावर विचार करावा असे देखील पवार यांनी प्रसिध्दीस पत्रकात म्हटले आहे.

Share this: