बातम्या व्हॉट्सअप डीपी वरून तरुणांला जबर मारहाण ;सहाजणांविरूध्द गुन्हा नोंद December 22, 2018December 22, 2018 वास्तव संघर्ष तू निखीलला तुझ्या नात्यातील मुलीचा फोटो व्हॉट्सअप डीपी वरून काढून टाकण्यास का सांगितले ?’ अशी विचारणा करीत संदेश टोपे याने त्याच्या हातातील गजाने व अन्य सर्वांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्यांनी फिर्यादींना जबर मारहाण केली. वास्तव संघर्ष चाकण – मोबाईल फोन हा आता नागरीकांचा जिवनावश्यक वस्तू झाला आहे तसाच आता सोशलमिडीयाही जिवनावश्यक झाला आहे असे वाटत आहे. फेसबुकवरील स्टेटस असो की व्हाटसपवरील डीपी असो. माञ याच व्हाटसप डीपीवरुन चाकण येथे हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे दतात्रेय नारायण जरे ( वय 35 वर्षे , रा. वाकी.बु, ता.खेड जि.पुणे ) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे . तर दतात्रेय जरे यांच्या फिर्यादीवरून संदेश मारुती टोपे, संतोष मच्छींद्र टोपे, निखील बाळासाहेब गारगोटे, अंकुश संतु गारगोटे, सुरज अशोक टोपे, अजय अंकुश गारगोटे ( सर्व रा. वाकी बु, ता.खेड, जि.पुणे ) या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जरे यांनी चाकण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी जरे व सचिन बबन जरे हे दोघे मोटार सायकलवरुन गारगोटे शिवीराची शाळा वाकी बु. येथून वस्तीकडे जात असताना जरे वस्तीच्या अलीकडे फिर्यादी जरे यांचा जाण्याचा रस्ता अडवून बेकायदा गर्दी जमवुन संदेश टोपे, संतोष टोपे, निखील गारगोटे, अंकुश गारगोटे, सुरज टोपे, अजय अंकुश गारगोटे यांनी संगनमत करून रस्त्यावर काठ्या टाकुन जरे यांच्या मोटार सायकलीस त्यांच्या मोटार सायकलने धडक दिली. ‘तू निखीलला तुझ्या नात्यातील मुलीचा फोटो व्हॉट्सअप डीपी वरून काढून टाकण्यास का सांगितले ?’ अशी विचारणा करीत संदेश टोपे याने त्याच्या हातातील गजाने व अन्य सर्वांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्यांनी फिर्यादींना जबर मारहाण केली. चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे Total Visits: 1,592 Share this: