बातम्या

दोन वर्षाच्या मुलाचा खून करून आईने केली आत्महत्या

पुणे (वास्तव संघर्ष) सासरच्या जाचाला कंटाळून पोलिस कर्मचार्‍याच्या पत्नीने आपल्या दोन वर्षाच्या चिमुकल्यांचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील हडपसर येथे घडली आहे .

आज(शनिवार) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. सासरच्या छळास कंटाळून ही घटना घडली असल्याचे सांगण्यात आले आहे.

हडपसर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी अमित दत्तात्रय कांबळे यांची पत्नी जान्हवी अमित कांबळे (वय २२) हिने आपल्या दोन वर्षाच्या शिवांश या मुलाचा खून करून स्वतःही ओढणीने पंख्याला लटकून आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी तिने लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये अमित (पती) तू माझ्यावर खूप प्रेम करतोस, मात्र वेळ देऊ शकत नाहीस, हे माझे दुर्दैव. सासू सुजाता माझा वारंवार छळ करीत असल्याचे त्या चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे.अधिक तपास हडपसर पोलिस करित आहेत.

Share this: