व्हिडीओ ;तोसिफ शेख यांची आत्महत्या नसून खून
कर्जत (वास्तव संघर्ष) शहरातील पीर दावल मलिक या देवस्थान ट्रस्टच्या भूखंडावरील अतिक्रमणे हटविली जावीत या मागणीसाठी तौसिफ हमीम शेख यांनी गुरुवारी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:ला पेटवून घेतले होते.
शेख हे ८० टक्के भाजल्याने त्यांना प्रथम नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना तातडीने ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र गुरुवारी मध्यरात्रीच प्रकृती गंभीर झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान हा मृत्यू नसून खून आहे असा आरोप मयत तोसिफ शेख यांच्या नातेवाईकांनी केला आहे. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे असे हे ते यावेळी म्हणाले. पुण्यातील ससून रुग्णालयात तोसिफ शेख यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी आणला होत. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.