“हम यहाँ के भाई है… असे म्हणत टोळक्यांकडून पिंपरी परिसरात दहशत
पिंपरी (वास्तव संघर्ष) : ‘हम यहां के भाई है असे म्हणत ‘नऊ जणांच्या टोळक्याने दोघांना मारहाण करून सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेले . तसेच शिवीगाळ करत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. ही घटना गुरुवारी (दि. 23) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास आंबेडकर कॉलनी पिंपरी येथे घडली आहे .
सुमित सुनील बहोत ( वय 26, रा. मिलिंदनगर ) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विकी सौदे ( वय 30 ), अमित सौदे ( वय 25 ), सोनू बिडलान ( वय 24 ) ,गोपी घलोत ( वय 27 , सर्व रा . सुभाषनगर , पिंपरी ) ,बल्ली राऊत ( वय 26 , रा . काळेवाडी )आणि अन्य चार आरोपीविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुमित आणि त्यांचे मित्र राज जाधव , सय्यद खान यांना आरोपींनी अडवले . फिर्यादी सुमित आणि राज जाधव यांना दगडाने व सिमेंटच्या गट्टने मारहाण करण्यात आली . यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले . फिर्यादी यांच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीची सोन्याची चैन आणि राज जाधव यांचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतला.सईद खानला तोंडावर मारहाण केली व शिवीगाळ करत धमकी दिली . ‘ हम यहा के भाई है , कौन बीच मे आता है देखता हु ‘ असे म्हणून परिसरात दहशत निर्माण केली. अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत .