रामदास आठवले व्यक्तिगत स्वार्थासाठी भाजप – शिवसेनेवर नाराज.-युवराज दाखले
पिंपरी – शिवसेना युतीवर रामदास आठवले नाराज झाल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच. शिवसैनिकांनी आठवले यांच्या भुमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा – शिवसेना युती झाली आहे.
माञ युतीतील आणखी एक मित्रपक्ष असणाऱ्या आरपीआयचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना – भाजपा युतीने दलित मतांना ग्राह्य धरु नये असा इशारा दिला होता. आठवले यांची युतीवर नाराजी व्यक्त केली आहे.तसेच तुम्ही आमचा आदर करा आणि आमच्याकडून आदराची अपेक्षा करावी असे ही त्यांनी शिवसेना- भाजपाला सुनावले होते याचा खरपुच समाचार मातंग समाजातील युवराज दाखले यांनी घेतला.
आर पी आय नेते रामदास आठवले यांनी आपल्या दलित (बहुजन) मतामध्ये मातंग समाजा ला ग्राह्य धरू नये आसा इशारा लहुजी शक्तासेना शहर प्रमुख युवराज दाखले यांनी दिला आहे.
राज्यात शिवसेना- भाजपा युती असून लोकसभा निवडणूक भाजपा २५ तर शिवसेना २३ जागा लढणार आहेत.
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत त्यांनी रिपब्लिकन पक्षाला दुय्यम स्थान दिले.
जागावाटपाचा हा निर्णय घेण्यापूर्वी एकदा आमच्याशी चर्चा करणे अपेक्षित होते.असे ही म्हणाले आहेत.
परंतु आठवले यांनी स्वता आत्मपरिक्षण कराव की,आपण किती बहुजन समाजातील मातंग समाजाला न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केला आहे
स्वताच्या राजकीय स्वाथाॕसाठी मातंग समाजाचा वापर आठवले यांनी केलेला आहे.