बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती सुधारावी म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून संत तुकाराम महाराज चरणी साकडे

पिंपरी (वास्तव संघर्ष) :राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे. ते सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची लवकरात लवकर प्रकृती सुधारावी यासाठी आज देहु येथे पिंपरी चिचंवड शहर राष्ट्रवादी युवतीच्या वतीने श्री क्षेत्रदेहू संत तुकाराम महाराज चरणी साकडे घातले. त्यांना दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

राज्यात गेले आठ महिने कोरोना च्या आजाराने अनेक जण त्रस्त आहेत. सर्वसामान्यांचे लॉक डाऊन आणि अन्य कारणामुळे मोठे हाल झाले. याच काळात राजकीय प्रतिनिधी व केंद्रीय मंत्री तसेच अभिनेते यांचाही आजाराने मृत्यू झाला आहे .

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही नुकतीच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सुधारून लवकरच नव्याने लोकसेवेत दाखल व्हावेत अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेस पिंपरी चिंचवड शहरध्यक्षा कु.वर्षा जगताप . कु.गीता मोरे (इमानदार) अध्यक्ष, राष्ट्रवादी युवती काँग्रेस, पिंपरी विधानसभा, कु.रुतुजा बिराजदार अध्यक्ष,राष्ट्रवादी युवती काँग्रेस चिंचवड विधानसभा सारिका धामे इत्यादी उपस्थित होते

Share this: