क्राईम बातम्या

पिंपरीतील नेहरूनगर येथे शंभर गुंडाचा तरुणावर प्राणघातक खुनी हल्ला ;पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची घटनास्थळी धाव

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरीतील नेहरूनगर येथे शंभर गुंडांनी एकञ होत राडा केला आहे.सर्व आरोपींच्या हातामध्ये तलवार , कोयते , लाकडी दांडके , बॅट , चॉपर , सिमेंटचे ब्लॉक , दगड , विटा होत्या .त्यांनी तरूणावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना शुक्रवारी ( दि . ३० ) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली .

नीलेश सुभाष जाधव ( वय ३५ , रा . नेहरूनगर , पिंपरी )असे प्राणघातक हल्ला झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

आशिष जगधने ( वय ३१ ) , इरफान शेख ( वय ३० ) , जितेश मंजुळे ( वय २८ ) , जावेद औटी ( वय २ ९ ) , आकाश हजारे ( वय ३० ) व त्यांचे इतर ९ ५ साथीदार ( नाव , पत्ता माहिती नाही ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी जाधव हे यांचे नेहरूनगर येथे कार्यालय आहे . शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी हे ऑफिसमोर पार्क केलेल्या कारमध्ये लॅपटॉप ठेवण्यासाठी गेले . त्यावेळी सुमारे १०० जण कार आणि दुचाकीवरून डबल ट्रिपल सीट आले . सर्व आरोपींच्या हातामध्ये तलवार , कोयते , लाकडी दांडके , बॅट , चॉपर , सिमेंटचे ब्लॉक , दगड , विटा होत्या .

एकाने निलेश जाधव यांच्याकडे बोट दाखवून ‘ हा होता का ‘ अशी विचारणा केली . याला आपण जिवंत सोडायचे नाही . याला संपवून टाकू ‘ असर म्हणत एकाने तलवारीने निलेश यांच्या पाठीवर वार केला . त्यानंतर आरोपींनी निलेश यांना पळवून मारहाण केली . कोणाच्यात दम असेल तर बाहेर या ‘ असे म्हणत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली . तसेच काही वाहनांची तोडफोड करून नुकसान केले . घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , उपायुक्त , गुन्हे शाखा आणि पिंपरी विभागाचे सहाय्यक आयुक्त , वरीष्ठ पोलीस निरीक्षक , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे . अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत .

Share this: