धक्कादायक: बायकोच्या मिञाला 10 व्या मजल्यावरून ढकलून केले ठार
चिखली (वास्तव संघर्ष):बायकोचा मिञ भेटायला आला म्हणून त्याचा राग येऊन पतीने एकास गंभीर जखमी करून 10 व्या मजल्यावरून ढकलून देऊन ठार मारले आहे. ही घटना बुधवारी 26 ऑक्टोबरला रात्री 10.20 वा चे सुमारास घडली.
निलेश जोर्वेकर (वय 37 वर्षे )असे मृत्यू झालेल्या तरुणचे नाव आहे.
याबाबत विजयकुमार जोर्वेकर यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पंकज शिंदे (रा.वूड्सविला फेज-1मोशी पुणे )या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादीचा भाऊ निलेश जोर्वेकर हा काल 26 ऑक्टोबर रोजी रात्री 10.20 वा चे सुमारास त्याच्या मैत्रिणीच्या ( रा . वूड्सविला फेज 1 , मोशी ) राहत्या घरी तिला भेटण्यासाठी गेला होता.तिचा पती पंकज शिंदे , वय 35 वर्षे याने तेथे जाऊन त्याच्या पत्नीच्या चरित्र्याच्या संश्यावरून वाद घालून कोणत्यातरी टोकदार हत्याराने पोटाच्या डाव्या बाजूस कमरेच्या वर भोकसून त्याला गंभीर जखमी केले . त्याला इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील राहत्या घराच्या गॅलरीतून खाली ढकलून देऊन त्याला जीवे ठार मारले आहे.याबाबत अधिक तपास एमआयडीसी भोसरी करीत आहे.