Video राहुल गांधी ‘पप्पू’ तर प्रियंका गांधी ‘पप्पी’ भाजप नेत्यांनी तोडले अकलेचे तारे
वास्तव संघर्ष आॅनलाईन :- आगामी लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत . जागोजागी प्रचार सभा घेतल्या जात आहेत असे असताना विरोधी पक्षांवर टीका टिपण्णी राजकीय पक्षांकडून केल्या जात आहेत. मात्र भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने काँग्रेसवर टीका करताना थेट खालची पातळीच गाठली आहे.
Union Min Mahesh Sharma in Sikandrabad- "Agar Mamata Banerjee yahan aa karke Kathak kare aur K'taka CM geet gaye toh kaun sun raha hai? Pappu kehta hai ki PM banunga,ab toh Pappu ki Pappi (Priyanka Gandhi)bhi aa gayi.Inse upar uth kar dekhna hai toh aaj humara sher Modi hai(16/3) pic.twitter.com/AQW6tCtRzZ
— ANI UP (@ANINewsUP) March 18, 2019
केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी आपल्या सिकंदराबाद येथे आयोजित केलेल्या रॅलीमध्ये विरोधी पक्षावर खालच्या पातळीची टीका केली आहे. त्यांनी आपल्या भाषणात म्हंटले की “जर ममता बॅनर्जी यांनी येथे येऊन कथ्थक केले आणि कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी येथे येऊन गाणे म्हंटले तरी त्यांना कोण ऐकणार आहे ?. महेश शर्मा एवढ्यावरच बोलून थांबले नाहीत तर त्यांनी काँग्रेसवर देखील निशाणा साधला ते म्हणाले की, ‘पप्पू (राहुल गांधी) म्हणतोय की मी प्रधानमंत्री होणार, आता तर पप्पू की पप्पी (प्रियंका गांधी) सुद्धा आली आहे. या सगळ्यांच्या वरती “आज हमारा शेर मोदी है” असे महेश शर्मा म्हणाले.