पिंपरीतील मोरवाडी कोर्टाचे लवकरात लवकर स्थलांतर करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पिंपरी(वास्तव संघर्ष) :पिंपरीतील मोरवाडी कोर्टाचे लवकरात लवकर स्थलांतर करण्यात यावे . तसेच मोशी येथील सेक्टर 14 मध्ये अद्ययावत न्यायालयीन संकुलाच्या कामास गती देऊन बांधकाम सुरू करण्याची मागणी पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे .त्यानंतर हे स्थलांतर लवकरात लवकर करण्यात यावे असा पवार यांनी आदेश दिले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणा-या नेहरुनगर येथे पिंपरीचे नवीन न्यायालय होणार असून तेथे पालिकेने फर्निचर ईत्यादी कामे केली आहेत. दरम्यान मोरवाडीतील न्यायालय हे स्थलांतर करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेहरूनगर येथे न्यायालय लवकरात लवकर स्थलांतर व्हावे तसेच पन्नास लाखांचा निधी वर्ग करा मोशी येथील नियोजित कोर्टाचे आणि न्यायालयीन कर्मचारी निवास संकुलाच्या विकास कामांसाठी महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त पन्नास लाखांचा निधी वर्ग झालेला नाही . विधी व न्याय विभागाकडून मागणी आल्यानंतर लगेचच निधी वर्ग करण्याचे ठोस आश्वासन देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
यावेळी पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष दिनकर बारणे , उपाध्यक्ष अतुल अडसरे , अॅड . गोरक्ष लोखंडे , माजी अध्यक्ष संजय दातिर , शिस्तपालन समितीचे माजी सदस्य अतिश लांडगे , सचिव हर्षद नढे , खजिनदार सागर अडागळे या शिष्टमंडळाने आमदार आण्णा बनसोडे हे उपस्थित होते.