क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

विवाहितेला शारीरिक , मानसिक व आर्थिक ञास दिल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भोसरी (वास्तव संघर्ष) -विवाहितेचा शारीरिक , मानसिक व आर्थिक ञास दिल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही घटना 21 /3/2020 ते 7/5/2020 दरम्यान गंधर्वनगरी , मोशी येथे झाली .

याप्रकरणी पीडित विवाहितेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

प्रशांत धनराज पाटील ( वय 30 ) , धनराज शंकर पाटील ( वय 45 ) , सुलोचना धनराज पाटील ( वय 45 ) , राहुल धनराज पाटील ( वय 34 ) , प्रियांका राहुल पाटील ( वय 29 , सर्व रा . गंधर्वनगरी , मोशी ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , यातील नमुद तारीख वेळी व ठिकाणी फिर्यादी यांना त्यांच्या सासरकडील लोक फिर्यादीचे पती व नमुद आरोपी यांनी मिळुन किरकोळ कारणांवरून विवाहितेचा छळ केला . तसेच विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली . त्यावरून विवाहितेचा शारीरिक , मानसिक व आर्थिक ञास दिला आहे . याबाबत सासरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत .

Share this: