क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

सांगवीत पिस्तुलाचा धाक दाखवत गळ्यातील 50 हजार रुपयांची सोन्याची साखळी जबरदस्तीने चोरून नेली

सांगवी (वास्तव संघर्ष) :सांगवीत रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या एका व्यक्तीला दोघांनी पिस्तुलाचा धाक दाखवला आणि शतपावली करणा-या व्यक्तीच्या गळ्यातील 50 हजार रुपयांची सोन्याची साखळी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 29) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली.

जसवंत कुमार अगरवाल (वय 42, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अगरवाल रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले होते. ते गोविंद गार्डन चौकातून पिके चौकाकडे जाणा-या ब्रिज जवळून जात होते. ब्रिज संपतो त्या ठिकाणी आले असता दोन अनोळखी व्यक्तींनी अगरवाल यांना पिस्तुलाचा धाक दाखवला. त्यांच्या गळ्यातील 15 ग्राम वजनाची 50 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसका मारून तोडून चोरून नेली. याबाबत अगरवाल यांनी रात्री गुन्हा नोंदवला. अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत

Share this: