पिंपळे निलख येथे कडक लाॅकडाऊन करावा ;नगरसेवक तुषार कामठे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
सांगवी (वास्तव संघर्ष) :पिंपळे निलख येथे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे .२० दिवसांपूर्वी पिंपळे निलख येथे १४ रुग्ण होते.आज पिंपळे निलख मध्ये सद्यस्थितीत १४१ रुग्ण आहेत.म्हणजेच २० दिवसांमध्ये १२७ रुग्ण वाढले आहेत.पिंपळे निलख हे कोरोनाचा हॉटस्पॉट होत चालला आहे . पालिका प्रशासनाने १३ ऑगस्ट २०२० पासून पिंपळे निलख परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले होते.पण सदर आदेशाची काटेकोर अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे पुन्हा पिंपळे निलख येथे कडक लाॅकडाऊन करावा अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नगरसेवक तुषार कामठे यांनी निवेदनातून केली आहे.
कामठे यांनी निवेदनात म्हटले आहे की,पिंपळे निलख परिसरातील नागरिक रस्त्याला लावलेले बॅरीकेट बाजूला करून ये – जा करत आहेत.पोलीस बंदोबस्त नसल्याने बाहेरील नागरिक , फेरीवाले , भाजीविक्रेते बिनदिक्कतपणे येथे फिरत आहेत.पिंपळे निलख व विशालनगरची मिळून जवळजवळ ७०,००० ते ८०,००० लोकसंख्या असुन येथे कोरोना वेगाने पसरल्यास परिस्थिती अवाक्याबाहेर जाईल . सध्या आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी सर्वात जास्त रुग्ण हे भाजीविक्रेते , दूधविक्रेते व फेरीवाले हे आहेत.सदर व्यावसायिक पालिका व पोलीस प्रशासनास जुमानत नाहीत.वरील परिस्थिती अशीच कायम राहिली तर पिंपळे निलखमध्ये कोरोनाला अटकाव करणे अशक्य होवून जाईल.
याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होईल.त्यामुळे पिंपळे निलख मध्ये आठ दिवस कडक लॉकडाऊन करून भाजीविक्रेते , दूधविक्रेते व फेरीवाले यांना येथे अटकाव करावा , येथील नोकरदार वर्गाला बाहेर जाण्यास प्रतिबंध करावे , भाजीविक्रेते , दूधविक्रेते व फेरीवाले यांची नियमित टेस्ट करावी जेणेकरून कोरोना आटोक्यात येण्यास मदत होईल . सदर बाब लक्षात घेवून आपण पिंपळे निलख मध्ये कडक लॉकडाऊन करून त्याची काटेकोटपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांना द्यावेत ,