आरोग्यबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

ओमायक्रोन विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गाफील न राहता काळजी घ्यावी-महापौर माई ढोरे

पिंपरी (वास्तव संघर्ष) :  करोना विषाणूच्या प्रादुर्भावाने विस्कळीत झालेले जनजीवन पुर्व पदावर येत असताना  ओमायक्रोन विषाणूमुळे तीसरी लाट येण्याची शक्यता आरोग्यतज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गाफील न राहता स्वतःची व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

देशात ओमायक्रोन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.नागरिकांनी राज्य शासनाने व महापालिकाने करोना संदर्भात केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा आणि सामाजिक अंतर राखावे. नागरिकांनी लवकरात लवकर करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घ्यावे. सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी करणे टाळावे. सार्वजनिक व खाजगी कार्यक्रमात करोना नियमाचे काटेकोर पालन करावे. शाळा महाविदयालयात शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी दक्षता घ्यावी.

महापालिका वेळोवेळी करोना संदर्भात आढावा घेऊन त्यावर उपाययोजना करत आहे. त्यास नागरिकांनी सहकार्य करावे. करोना सदर्भात सर्व आव्हानांना तोंड देण्यास महापालिकेच्या सर्वच यंत्रणा  सज्ज असून नागरिकांनीही खबरदारी घेणे गरजेचे आहे

Share this: