गाडी घेण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये आणण्याची विवाहितेकडे मागणी

पिंपरी (वास्तव संघर्ष) : नवीन बुलेट गाडी घेण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये आणण्याची विवाहितेकडे मागणी केली . विवाहितेने पैसे न आणल्याने तिला सासरच्या लोकांनी डांबून ठेवले . तसेच तिचा छळ केला . हा प्रकार ऑक्टोबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव , ता . निफाड येथे घडला .

पीडित विवाहितेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

पती किशोर दशरथ मोहिते ( वय 25 ) , दिर ईश्वर दशरथ मोहिते ( वय 30 ) , दिर ज्ञानेश्वर दशरथ मोहिते ( वय 33 ) , दिर संजय दशरथ मोहिते ( वय 35 ) , सासरे दशरथ मोहिते ( वय 50 ) , सासु ( वय 45 ) , आणि 3 जाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी सासरच्या लोकांनी फिर्यादी विवाहितेकडे नवीन बुलेट घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्याची मागणी केली . विवाहितेने ते पैसे आणले नाहीत म्हणून आरोपींनी विवाहितेला हाताने मारहाण करून शिवीगाळ केली . तसेच पतीने विवाहितेला शारीरिक सुखापासून वंचित ठेवले . आरोपींनी विवाहितेला तीन दिवस घरामध्ये डांबुन ठेवले . तिचा मानसिक व शारीरिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . फिर्यादीने माहेरी आल्यानंतर या प्रकरणी तक्रार दिली आहे . अधिक तपास दिघी पोलीस करीत आहेत .

Share this: