क्राईम बातम्या

चाकण येथे स्कॉर्पिओला बांधून चोरट्यांनी पळवली थेट एटीएम मशिन

पिंपरी-चिंचवडमधील चाकण परिसरातील  म्हाळुंगे येथे अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम थेट मोटारीच्या साहाय्याने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. एटीएममध्ये  ९ लाख रुपये असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकणच्या म्हाळुंगे येथे अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. त्या ठिकाणी अज्ञात तीन जणांच्या टोळक्याने लिफ्टसाठी वापरण्यात येणाऱ्या केबलद्वारे एटीएम बांधून स्कॉर्पिओ मोटारीने ओढून पळवून नेल्याची घटना रात्री दोनच्या सुमारास घडली. भरधाव वेगात स्कॉर्पिओ मोटार पोलिसांच्या जवळून गेली, मात्र अशी काही घटना घडली असेल असे पोलिसांना वाटले नव्हते. काही वेळानंतर एटीएम पळवून नेल्याचं पोलिसांना समजलं. तिघांपैकी दोघांनी एटीएम सेंटरमध्ये जाऊन सीसीटीव्हीवर स्प्रे मारला होता. एटीएम सेंटरवर असलेल्या सीसीटीव्हीत अज्ञात तिघेही कैद झालेत. अज्ञात चोरांच्या शोधासाठी गुन्हे शाखा एकचे कर्मचारी, अधिकारी आणि म्हाळुंगे पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत

Share this: