बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

लोक न्यायालय दिनी पिंपरी न्यायालयात १४२ तर, आकुर्डी मनपा न्यायालयात १४३० खटले निकाली

पिंपरी (वास्तव संघर्ष ) :-  पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दिवाणी व फौजदारी न्यायालय पिंपरी व पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १४) रोजी पिंपरी येथील न्यायालयात तसेच आकुर्डी येथील पिं. चिं.म.न.पा.न्यायालयात लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.
पिंपरी न्यायालयात १४२ खटले निकाली काढले तर तडजोड शुल्क व दंड स्वरूपात १,७९,८,७४९ ची वसुली झाली. आकुर्डी मनपा न्यायालयात एकूण १४३० प्रकरणे निकाली काढण्यात आली तर, दंड व विविध करांच्या स्वरूपात ११, ५१, ८७, ८५६ रूपयांची वसुली झाली. सदर कार्यक्रमात न्यायालयातील मुख्य न्यायाधीश ए. यु. सुपेकर, सह न्यायाधीश एन. टी.भोसले, सह न्यायाधीश डी. आर. पठाण, सह न्यायाधीश आर एन मुजावर यांच्या उपस्थितीत तर, आकुर्डी न्यायालयामध्ये मे. एस. बी. देसाई यांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष अॅड. सतीश गोरडे होते. पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशन चे अध्यक्ष अॅड. श्री. दिनकर बारणे, उपाध्यक्ष अॅड.अतुल अडसरे, सचिव अॅड.हर्षद नढे, महिला सचिव सुजाता बिडकर, सहसचिव अॅड. पूनम राऊत, खजिनदार अॅड. सागर अडागळे, ऑडीटर अॅड. सुजाता कुलकर्णी व सदस्य अॅड. राजेश रणपिसे, अॅड. अनिल पवार, अॅड.हरीश भोसुरे, अॅड.विश्वेश्वर काळजे तसेच अॅड. देवराम ढाले, अॅड.सुदाम साने, अॅड.सुनील कडूस्कर व इतर वकील वर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलतांना न्यायालयातील न्यायाधीश ए. यु. सुपेकर व डी. आर पठाण यांनी लोक न्यायालयाचे सहभागी होण्याचे महत्व सांगितले व बार चे अध्यक्ष अॅड. दिनकर बारणे यांनी जास्तित जास्त पक्षकारांनी लोक न्यायालयात सहभागी होवून खटले निकाली काढावेत, असे आवाहन केले.

लोक न्यायालयात पॅनल परिक्षक म्हणून अॅड. मुग्धा नंदकर, अॅड. कविता चव्हाण, अॅड. प्रियांका तोलनुरे, अॅड. जयश्री मुरूमकर, अॅड. सुरेखा थोरात, अॅड.सारिका परदेशी, अॅड.माधुरी दाते, अॅड.सुनंदा कडूस्कर, अॅड.स्नेहा कांबळे यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अॅड. हर्षद नढे यांनी तर, आभार अॅड. सुजाता बिडकर यांनी मानले

Share this: