क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पती-मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या देत, महिलेवर शारीरिक अत्याचार

पिंपरी (वास्तव संघर्ष ) :- पिस्तुलाचा धाक दाखवून, पती आणि मुलांना मारण्याच्या धमक्या देऊन महिलेवर शारीरिक अत्याचार करणार्‍या आरोपीला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना जानेवारी २०१६ ते मे २०१९ या कालावधीत बाणेर येथे घडली.

बाळासाहेब सदाशिव मुरकुटे (वय ३३, रा. बाणेर गाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१६ ते मे २०१९ या कालावधीत आरोपी बाळासाहेब याने फिर्यादी महिलेच्या फ्लॅटवर तसेच इमारतीच्या पार्किंगमध्ये कारमध्ये पीडित महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवला. तसेच महिलेच्या पती आणि मुलांना मारण्याच्या धमक्या देऊन तिचे अश्लील व्हिडिओ तयार केले. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी शारीरिक अत्याचार केला. याबाबत महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत

Share this: