क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

महीलेसमोर लज्जास्पद चाळे करणा-या रिक्शाचालकावर गुन्हा दाखल ;पिंपळे सौदागर येथील घटना

पिंपरी (वास्तव संघर्ष ) :- पिंपळे सौदागर परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ३४ वर्षीय महिलेला पाहून एका अज्ञात रिक्षाचालकाने हस्तमैथुन केल्याचा प्रकार समोर आला आहे.महीलेसमोर लज्जास्पद चाळे करणा-या या अज्ञात रिक्शाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिलेने आधी याकडे दुर्लक्ष केले होते. संबंधित रिक्षाचालकाचा रिक्षा क्रमांक घेऊन फिर्यादी यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. विकृत रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, (एम.एच-१२ क्यू.आर-१४७१) संबंधित क्रमांकाची रिक्षा कोणाला दिसल्यास सांगवी पोलीस ठाण्याच्या संपर्क करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी केले आहे

Share this: