धक्कादायक: पीएमपीएल बसच्या धडकेत विद्यार्थी जागीच ठार
धक्कादायक: पीएमपीएल बसच्या धडकेत विद्यार्थी जागीच ठारभोसरी (वास्तव संघर्ष) :पीएमपीएल बसच्या धडकेत एक विद्यार्थी जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या अपघातामध्ये तरुणाचा जीव गेला आहे.त्यामुळे मृत तरुणाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.ही घटना शनिवारी (दि.3) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास डायची कंपणीच्या गेटसमोर जुना मुंबई पुणे हायवे कासरवाडी येथे घडली आहे.
उमेश लालचंद राठोड (वय-22,रा . आकुर्डी, मुळ रा.मितानाईक तांडा,कोळवाडी , ता कन्नड , जि औरंगाबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे.
जावेद आवेद शेख( वय-50धंदा,रा.कानडे यांची बिल्डींग,दत्त मंदीराशेजारी वाल्हेकरवाडी चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या बस चालकाचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,उमेश लालचंद राठोड तरूण हा आकुर्डी येथे राहायला होता. तो एक विद्यार्थी असून कासरवाडी येथे काम करत होता.तो काम करीत असलेल्या हॉटेल कलासागर कासारवाडी येथुन तो रहात असलेल्या आकुर्डी येथील रूमवर जात असताना तो बीआरटी रोड क्रॉस करीत असताना पीएमपीएल ची बस( क्र. एम. एच. 14एच.बु. 5994) वरील चालकाने त्याचे ताब्यातील बस वाहतूकीचे नियमाकडे दुर्लक्ष करून हयगयीने अविचाराने भरधाव वेगाने चालवून उमेश यास धडक मारून त्याचे डोक्याला गंभीर दुखापत केली.ही धडक इतकी भीषण होती, की उमेशचा जागीच मृत्यू झाला.याबाबत अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत.