क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

बनावट चावीच्या सहाय्याने एटीएम उघडून 66 लाख रूपये चोरणाऱ्या दोन इंजिनियर चोरट्यांना पोलिसांनी केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) : माऊलीनगर व वडमुखवाडी दिघी येथील दोन एस.बी.आय. बँकेचे ए.टी.एम शुक्रवार दि .२४ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान अज्ञात आरोपींनी बनावट चावीच्या सहाय्याने उघडून त्यातील 66 लाख रुपये चोरून नेले होते. याप्रकरणी दोन इंजिनियर चोरट्यांना पोलिसांनी आज शनिवार दिनांक 10 आॅक्टोबर रोजी मुद्देमालासह अटक केली आहे.

मनोज उत्तम सूर्यवंशी ( वय 30 , रा . पिंपरी वाघिरे , पिंपरी ) किरण भानुदास कोलते ( वय 35 , रा . चिखली ) ( दोघेही मूळ रा.जळगाव ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत . हे दोन्ही आरोपी व्यवसायाने इंजिनियर असल्याचे पोलिसांनी पञकार परिषदेत सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी येथील माऊलीनगर व वडमुखवाडीत असलेल्या एसबीआय बँकेच्या दोन एटीएम मशीन बनावट चावीच्या सहाय्याने खोलून 66 लाखांची रोकड चोरी झाल्याची तक्रार 24 सप्टेंबर रोजी दिघी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती . याप्रकरणी तपास करण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांच्या कडील अधिकारी व कर्मचारी यांच्या दोन टिम तयार करण्यात आल्या . तपास दरम्यान , सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांना मिळालेल्या माहीतीवरून पिंपरी पुणे येथे सापळा रचून दोन संशयित आरोपींना दुचाकीसह ( एमएच 19 बीटी 2499 ) ताब्यात घेतले . चौकशीअंती त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली . पोलिसांनी त्यांच्याकडून एटीएम मधून चोरी केलेली 66 लाख 10 हजार 100 व 60 हजार किंमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे . गुन्ह्याचा अधिक तपास गुन्हे शाखा युनिट तीन करीत आहेत .

Share this: